logo

आमदार धिरज लिंगाडे यांचे मेहुणे प्रमोद पाटील यांचे निधन*

SHAIKH ASIF SHAIKH YUSUF BULDANA MAHARASHTRA AIMA न्यूज

* *आमदार धिरज लिंगाडे यांचे मेहुणे प्रमोद पाटील यांचे निधन*


बुलढाणा, 4 मे (AIMA न्यूज) : अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या बहिण तथा यशवंत अध्यापक महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या नयनाताई पाटील यांचे पती प्रमोदराव मनोहर पाटील आता या जगात नाही. काल शुक्रवार 3 मे रोजी पुण्यामध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. सायंकाळच्या सुमारास स्विमिंग करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आज सकाळी पुण्यामध्ये बाणेर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत प्रमोदराव पाटील यांचा स्वभाव साधा सरळ आणि लोकांना जोडणारा होता. इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. मुद्देसूदपणा आणि परखडता त्यांचा स्थायी भाव होता. त्यांच्या या सुंदर स्वभावामुळे बुलढाण्यामध्ये त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. मुलगा आणि सुनबाई यांच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमुळे मागील चार ते पाच वर्षांपासून ते बुलढाण्यातून पुणे येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

14
969 views